Kagal Vidhan Sabha Elections 2024
Kagal Vidhan Sabha Elections 2024sakal

Kagal Assembly Elections 2024: मुख्यमंत्र्यांसमोर मंडलिक गटाची पोस्टरबाजी ‘चेहरा नवा, विरेंद्र हवा’ चा फलक झळकवला !

Kagal Vidhan Sabha Elections 2024: मुख्यमंत्री शिंदे या कार्यक्रमाला आल्यानंतर मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर ‘चेहरा नवा, वीरेंद्र मंडलिक हवा’ चा फलक झळकवला.
Published on

कोल्हापूर: कागल विधानसभा मतदारसंघातील पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध माजी खासदार प्रा. संजय मंडलिक गटातील वादाचे पडसाद आज गारगोटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात उमटले.

मुख्यमंत्री शिंदे या कार्यक्रमाला आल्यानंतर मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर ‘चेहरा नवा, वीरेंद्र मंडलिक हवा’ चा फलक झळकवला.

शिंदे यांनी या फलकाकडे बघत त्यांच्यासोबत असलेल्या प्रा. मंडलिक यांच्याकडे बघून स्मितहास्य केले.

प्रा. मंडलिक यांचे पुत्र ॲड. वीरेंद्र मंडलिक हे शिंदे शिवसेनेचे युवासेना प्रमुख आहेत. त्यांनी काल बोलवलेल्या मेळाव्यात मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली. ‘गोकुळ’ पासून ते लोकसभा निवडणुकीत मंडलिक गटाच्या पराभवाचा पाढा वाचतानाच ॲड. वीरेंद्र यांनी मुश्रीफ यांनी आता थांबून कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या उपकाराची परतफेड म्हणून मला संधी द्यावी, अशी मागणी केली. या वादाचे पडसाद जिल्ह्यात उमटले. यावरून महायुतीत सर्व काही अलबेल नाही, असाही संदेश दिला गेला.

हा प्रकार ताजा असताना गारगोटी येथे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने झालेल्या विविध विकासकामांच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्री शिंदे आज गारगोटीत होते. त्यांचे सभास्थळी आगमन होताच, मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोरच पोस्टर झळकवले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अगदी जवळच ही पोस्टरबाजी झाली.

#ElectionWithSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.