गोंदिया : विधानसभा निवडणुकीत तिकीट आपल्यालाच मिळावी, यासाठी इच्छुकांच्या मुंबईवाऱ्या सुरू झाल्या आहेत. यात आजी-माजी आमदारांसह नवख्या इच्छुकांचाही समावेश आहे. गोंदियात महाविकास आघाडीत काही खरे नाही; आमगावात विद्यमान आमदाराला यंदा पक्ष उमेदवारी देईल की नाही, यात संभ्रम आहे, तर अर्जुनी मोरगावात महायुतीत कार्यकर्ते फुटीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.