येवला : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिंदे यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून भुजबळांच्या विरोधात ‘जरांगे पॅटर्न’ची खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भुजबळांचे २००४ मधील येथील निमंत्रक असलेले शिंदे यंदा त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत.