Jalgaon Jamod Assembly Elections : जळगाव (जा) मतदारसंघ कुणाच्या वाट्याला? कांग्रेस की राष्ट्रवादी; कार्यकर्त्यांचे लक्ष

Jalgaon Jamod Vidhan sabha Elections : जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. कार्यकर्त्यांचे लक्ष महाविकास आघाडीच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.
Jalgaon Jamod vidhan sabha election 2024
Jalgaon Jamod vidhan sabha election 2024sakal
Updated on

संग्रामपूर : जळगाव जामोद विधानसभा मतदार संघामध्ये उमेदवारी देताना महाविकास आघाडीमध्ये चांगलीच रस्सी खेच शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरू असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी दोघांकडून हा मतदारसंघ आपल्या पारड्यात पडावा यासाठी जोरकस प्रयत्न सुरू असून मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार याकडे गावपातळीवरील कार्यकर्त्यांचे लक्ष पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लागले आहे. सोबतच इतर पक्षाचे ही नेते महाविकास आघाडीच्या निर्णायक भूमिकेवर लक्ष ठेवूनच आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.