Yavatmal Assembly Election 2024 : नव्या आमदारांच्या जबाबदारीचे गाठोडे होणार जड, लोकसंख्या वाढीचा परिणाम
Yavatmal Vidhan Sabha Election : यवतमाळमध्ये आगामी आमदारांच्या जबाबदारीचे गाठोडे पूर्वीपेक्षा जड होणार आहे, कारण प्रत्येक आमदाराला सरासरी ३ लाख ६० हजार लोकांचे प्रतिनिधित्व करावे लागणार आहे.
यवतमाळ : पंधराव्या विधानसभेत निवडून जाण्यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे. मात्र या आगामी आमदारांच्या शिरावर जबाबदारीचे गाठोडे पूर्वीपेक्षा अधिक जड होणार आहे. आतापर्यंत साधारण तीन लाख लोकांचे प्रतिनिधित्व एका आमदारांकडे येत होते.