विरार: विधानसभा निवडणुकिला आता रंग चढू लागला असून काल उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस असताना महाविकास आघाडीत वसई मध्ये बिघडी झाली आहे लोकसभेला शिवसेनेच्या(उबठा) उमेदवाराला वसई मधून सगळ्यात जास्त मते मिळाली असतानाही वसई तालुक्यातील वसई आणि नालासोपारा या दोन्ही मतदार संघ काँग्रेसला दिल्याने शिवसैनिक मध्ये नाराजी असून याला जिल्हा प्रमुख पंकज देशमुख जबाबदार असून त्यांना हटविण्याची मागणी काल वसई मध्ये झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत घेण्यात आली असून याबाबतचा ठराव पक्षप्रमुखना पाठविण्यात आल्याने वसई मध्ये महाविकास आघाडीत बिघडी झाल्याचे चित्र समोर आले आहे.