रत्नागिरी: गेली पंचवीस वर्षे वर्चस्व अबाधित राखणाऱ्या आणि ग्रामीण भागात घराघरांत रुजलेल्या शिवसेनेचे अडीच वर्षांपूर्वी दोन तुकडे झाले. या मोठ्या राजकीय घडामोडींमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील राजकीय समीकरणे पुरती बदलली. या विभाजनाचा फटका सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिकाला बसला. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठपैकी पाच ते सहा जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना, अशी ‘काँटे की टक्कर’ अनुभवायला मिळणार आहे.