विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. त्यानंतर महाविकास आघाडी आता पुढील तयारीसाठी लागली आहे. दरम्यान आज काँग्रेसने पत्रकार परिषद घेत याची माहीती दिली.
जागावाटपा दरम्यान महाविकास आघाडीतील पक्षांनी एकाच जागेवर वेगवेगळे उमेदवार दिले होते. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पण आता महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारची मैत्रीपूर्ण लढती होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ज्या जागांवर महायविका आघाडीतील पक्षांनी दोन उमेदवार दिले आहेत, तेथून एका पक्षाचा उमेदवार माघार घेणार हे निश्चित झाले आहे.
यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 'यंदा पंजा' हे गाणेही लाँच केले.