मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीशिवाय आता तिसरा पर्यायही नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यानुसार तिसऱ्या आघाडीवर आता शिक्कामोर्तब झालं आहे, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी पुण्यात पार पडलेल्या बैठकीत दिली.
पुण्यात तिसऱ्या आघाडीसंदर्भात एक बैठक पार पडली. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजी छत्रपती यांनी या बैठकीला हजेरी लावली. यावेळी 'परिवर्तन महाशक्ती' नावानं तिसरी आघाडी स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. यासंदर्भात आता समन्वय समिती नेमून त्याद्वारे सर्व निर्णय घेतले जातील, असंही या बैठकीत ठरलं आहे.
तसंच ज्या राजकीय पक्षांना या आघाडीत यायचं आहे त्यांनी २६ सप्टेंबरपर्यंत सहभागी व्हावं असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे. २६ तारखेला या तिसऱ्या आघाडीचा छत्रपती संभाजीनगर इथं मेळावा होणार आहे.
परिवर्तन महाशक्ती या नावानं एक सुसंस्कृत महाराष्ट्र, एक वेगळा पर्याय या महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही पुढे येत आहोत, असं या बैठकीत संभाजीराजे यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.