वर्धा : निवडणुकीचा बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले. जिल्ह्यात वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात भाजपची सत्ता आहे. या तीन मतदार संघासह देवळी विधानसभेतही भाजपने लढण्याची तयारी केली आहे. .महायुतीत मित्रपक्षाला गत निवडणुकीत दिलेल्या मतदार संघावर भाजपने दावा केला आहे. लोकसभा निडणुकीत झालेल्या चुका विधानसमेत होणार नाही याची काळजी घेण्याकरिता पक्ष वेळीच कामाला लागला आहे. याकरिता त्यांनी विविधपक्षीय पदे तयार केली आहेत.विधानसभा निवडणुकीकरिता जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी पद निर्माण केले आहे. या पदाकरिता जिल्ह्याची ओळख असलेले आणि निवडणुका हाताळण्याचा दांडगा अनुभव तसेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्ती सुधीर दिवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्तीनंतर त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी वर्धेतीलचारही मतदार संघ भाजप लढवणार असल्याचे सांगितले. यात तीन पक्के तर देवळी जवळपास पक्के झाल्याचे सांगितले. जिल्ह्यात गत विधानसभा निवडणुकीत आम्ही तीन व देवळी विधानसभा मित्र पक्ष शिवसेनेने लढवली. पण, या निवडणुकीत देवळीची जागाही भाजपच लढविणार, शंभर टक्के खात्री आहे. उमेदवारही निश्चित आहे. ती घोषणा निवडणूक समिती व ज्येष्ठ नेते करतात..लोकसभा निवडणुकीत उशिराने आलो होतो. वेळ कमी मिळाला. आता ही चूक टळली आहे. जिल्ह्यातील वर्धा, देवळी, आर्वी व हिंधणघाट या चारही मतदारसंघांची जबाबदारी घेत काम करणार असल्याचे त्यांनी सांगिसले. या चारही जागा निवडून आणण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.