Maharashtra Assembly Election 2024: शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचं अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न सुरू असल्याची क्लिप समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आपल्या जिवाला धोका असून बाबा सिद्दीकींप्रमाणे आपली हत्या करण्याचा डाव असल्याचे रमेश कदम म्हणाले आहेत. या प्रकरणी पोलिसांना तीन जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.