बाळापूर : विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान आमदार नितीन देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर मुळचे कॉंग्रेसी नेते ॲड. नतिकोद्दीन खतिब यांनी वंचित मध्ये प्रवेश करून ते वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.