महायुतीला बंडाचे ग्रहण! मतदारसंघातील तिन्ही बंडखोर नॉट रिचेबल, उमेदवारांची धाकधूक वाढली

Vikramgad Constituency: महायुतीला बंडाचे ग्रहण लागले आहे. मतदारसंघातील तिन्ही बंडखोर नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे आता उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
mahayuti maharastra
mahayuti maharastra esakal
Updated on

भगवान खैरनार, मोखाडा: पालघर जिल्ह्यातील बोईसर, पालघर आणि विक्रमगड या मतदारसंघात निष्ठावंतांना डावलल्याने तसेच वरिष्ठांनी शब्द फिरवल्याने महायुतीमध्ये बंडाळी झाली आहे. येथे महायुतीतील नाराज पदाधिकाऱ्यांनी बंडाचा झेंडा फडकावत बंडखोरी करून ऊमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीला बंडाचे ग्रहण लागले आहे. बंडाळी शमविण्यासाठी आणि मोडीत काढण्यासाठी वरिष्ठांचे प्रयत्न सुरू असताना तिन्ही विधानसभा क्षेत्राचे बंडखोर उमेदवार नॉट रिचेबल झाले आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्टींची डोकेदुखी तर अधिकृत उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.