दिनेश गोगी, उल्हासनगर: सोमवारी 18 तारखेला विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होणार आहे. अशात महाराष्ट्रात सर्वाधिक सिंधी मतदार असणाऱ्या उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात सिंधी समाजाचा राजकीय वारसा ठरवणारी स्पर्धा रंगणार असून यंदा पहिल्यांदाच ही निवडणूक जिंकण्यासाठी तीन सिंधी उमेदवारांत टशन निर्माण झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.