मुंबई : विरार इथं झालेले कथित पैसे वाटप आणि त्यामध्ये आलेलं विनोद तावडेंचं नाव त्याचबरोबर या प्रकरणाचे समोर आलेले व्हिडिओ यामुळं राज्यात दुपारपासून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तसंच भाजपवर कडवी टीका केली. भाजपचा हा नोट जिहाद सुरु आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.