कोल्हापूर : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मतदार संघात महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भाषण केले. या सभेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आणि महायुती सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. या सभेला खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.