ठाकरेंवर नामुष्कीची वेळ! चोपड्यात उमेदवार बदलला; BJPतील इच्छुकाला ताफ्यात घेत मैदानात उतरवलं, मविआच्या गोटात नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray Changed Candidate: चोपड्यातून ठाकरे गटाचा उमेदवार बदलला आहे. राजू तडवी यांच्याऐवजी प्रभाकर सोनवणे यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे आता चर्चा होत आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayESakal
Updated on

विधानसभा निवडणूक जाहीर होताच महायुती आणि महाविकास आघाडीने त्यांचे उमेदवार घोषित केले आहेत. तसेच या दोन्ही आघाड्यांमध्ये पडद्याआड घडामोडी घडत आहेत. आता मविआमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेला उमेदवार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने बदलला आहे. चोपडा मतदारसंघात हा उमेदवार बदलण्यात आला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ठाकरे गटावर नामुष्कीची वेळ आल्याचे बोलले जात आहे. जाहीर केलेला उमेदवार बदलून नुकताच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंनी जळगावमध्ये त्यांचा उमेदवार बदलला आहे. चोपडा मतदारसंघात राजू तडवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आता त्यांच्याऐवजी प्रभाकर सोनवणे यांना संधी देण्यात आली आहे. प्रभाकर सोनवणे यांचा आज ठाकरे गटात पक्ष प्रवेश झाला आहे. त्यानंतर त्यांना लगेच उमेदवारी देण्यात आली आहे. याअगोदर राजू तडवी यांच्या नावाची घोषणा झाली होती. मात्र त्यांची उमेदवारी रद्द करत प्रभाकर सोनवणे यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Uddhav Thackeray
Ladki Bahin: प्रचारासाठी महायुतीचं ब्रम्हास्त्र! लाडक्या बहिणी उतरल्या मैदानात; कारण काय? पडद्याआड काय घडतंय?

प्रभाकर सोनवणे हे याआधी भाजपमध्ये होते. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या चोपडा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर उमेदवार बदलाची नामुष्की ओढवली आहे. अनु. जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात खरेतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाने दावा केला होता. या पक्षाची ताकदही मतदारसंघात आहे. ज्येष्ठ आणि अनुभवी नेते अरुणभाई गुजराथी यांनी या मतदारसंघाचे अनेक वर्षे प्रतिनिधीत्व केले आहे.

ठाकरे गटाने रविवारी या जागेसाठी राजू तडवी यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उमेदवाराच्या क्षमतेबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्याकडे तक्रार केली. अखेरीस ठाकरे गटाने सोमवारी मोठी खेळी करत भाजपचे पदाधिकारी तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांना गळाला लावत प्रवेश दिला. त्यांची उमेदवारीही घोषित केली. याठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेने माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी दिली असून दोघा सोनवणेंमध्ये यानिमित्ताने लढत होणार आहे.

Uddhav Thackeray
Assembly Election: पवारांची ५७ वर्षांची परंपरा युगेंद्र पवार सुद्धा पाळणार! काय आहे कान्हेरी मारुतीचे बारामतीच्या निवडणुकीशी कनेक्शन?

दरम्यान चोपडा मतदारसंघात लता सोनवणे या विद्यमान आमदार आहेत. महायुतीकडून यावेळी ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली आहे. यामुळे आता त्यांचे पती चंद्रकांत सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.आता त्यांच्या विरोधात प्रभाकर सोनवणे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. आता या मतदारसंघात सोनवणे विरुद्ध सोनावणे अशी लढत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.