महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा रंगलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेते दोन भाग झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. दरम्यान साम टीव्हीवरील "ब्लँक अँड व्हाईट" या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मुलाखत दिली. सकाळ माध्यम समूहाचे संपादक निलेश खरे यांनी घेतलेल्या या मुलाखतीत, ठाकरे यांनी भाजप, बंडखोर आमदार, आणि महाराष्ट्राच्या हिताबाबत रोखठोक मत व्यक्त केली.