मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची मुंबईतील बीकेसीत सभा पार पडली. बीकेसीच्या मैदानात सभास्थळी पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे पोलिसांवर भडकल्याचं पाहायला मिळाले. यावेळी त्यांचा संताप अनावर झाल्यानं त्यांनी पोलिसांनाच दम देण्याचा प्रयत्न केला..Maharashtra Election 2024 : राहुल गांधींचं पुन्हा खटाखट... ! राज्यात महिलांसाठी महिन्याला 3,000 रुपये अन् मोफत एसटी प्रवासाची घोषणा.नेमकं काय घडलं?उद्धव ठाकरे बीकेसीत पोहोचल्यानंतर त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा आणि खासगी सुरक्षा रक्षकांचा गराडा होता. तसंच त्यांच्या मागे आदित्य ठाकरे देखील होते. पण या सर्वांना तिथं सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी सोडलं नाही. उद्धव ठाकरे एकटेच मेटल डेटेक्टरची चौकट पार करुन पुढे गेले, पण मागे त्यांच्या सुरक्षा रक्षकांना पोलिसांनी अडवून ठेवल्यानं ते चांगलेच भडकले..Maharashtra Election 2024: मविआनं जाहीर केली ‘लोकसेवाची पंचसुत्री’; ‘या’ पाच गोष्टींची दिली हमी.उद्धव ठाकरे भडकले असल्याचं यावेळी ठाकरेंसोबत असलेल्या त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या लक्षात ही बाब आली. तेव्हा त्यानं मी काय झालंय ते बघतो, असं सांगत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण आदित्य ठाकरेंनाही पोलिसांनी अडवून ठेवल्यानं उद्धव ठाकरेंचा संताप अनावर झाला आणि त्यांनी या अडवणूक करणाऱ्या पोलिसांनाचं दम देण्याचा प्रयत्न केला. “कोण आहेत हे यांचं नाव घेऊन ठेवा” अशा शब्दांत त्यांनी संबंधित पोलिसांना संबोधून बोलले..Donald Trump : शूटरच्या निशाण्यावर केवळ ट्रम्पच नव्हते.. क्रूक्स प्लॅनमध्ये यशस्वी झाला असता तर सभेचं झालं असतं स्मशान.दरम्यान, पोलिसांनी ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांसह आदित्य ठाकरेंना देखील आत जाण्यास सोडलं. त्यामुळं क्षणभर निर्माण झालेला हा गोंधळ मिटला आणि पुढे व्यासपीठावर जाऊन उद्धव ठाकरे यांनी भाषणंही केलं. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.