Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, सरकार स्थापनेसाठी केवळ 72 तासांचा अवधी असेल. कारण विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत 25 नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन झाले नाही, तर संवैधानिक व्यवस्थेनुसार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल.
त्यामुळेच राजकीय समीकरण कायम राहावे आणि युतीमध्ये परस्पर मतभेद निर्माण होऊ नयेत, यासाठी निकालापूर्वीच बैठकांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.त्यादृष्टीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी परस्पर समन्वय राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर आता उद्धव ठाकरेंच्या गटातून मोठी घडामोड समोर आली आहे. उद्धव ठाकरेंनी निकालासाठी पुन्हा लाईव्ह शस्त्र बाहेर काढलं आहे.