Vidhan Sabha Elections 2024: ‘‘ मी महाराष्ट्रद्रोह्यांशी कधीही हातमिळवणी करणार नाही, मग ते भाजप असो अथवा‘गुनसे’ (गुजरात नवनिर्माण सेना). अदानींनी माझे सरकार पाडले की नाही? याबद्दल शरद पवार आणि अजित पवारच जाहीर बोलले आहेत. येन केन प्रकारे आपलीच सत्ता राखण्यासाठी भाजपचा ‘सत्ता जिहाद’ चालला आहे अन् महाराष्ट्र तो यशस्वी होऊ देणार नाही,’’ अशा शब्दांत शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी ठाकरे यांच्याशी साधलेला संवाद.