Arvi Vidhan sabha election 2024 : आर्वी मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची धाकधूक सुरू आहे. भाजपमध्ये विद्यमान आमदार दादाराव केचे आणि सुमीत वानखेडे यांच्यात चांगलीच स्पर्धा आहे.
आर्वी (जि. वर्धा) : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोर धरत आहे. यात महाविकास व महायुतीचा तिढा अद्याप कायम आहे. भाजपचा उमेदवार म्हणून विद्यमान आमदार दादाराव केचे की नवा चेहरा अशी ओळख असलेले सुमीत वानखेडे यांना संधी मिळेल याकडे लक्ष लागले आहे.