Islampur Vidhan sabha : विरोधातला उमेदवार सुद्धा जयंत पाटीलच ठरवतात? कसा होतो करेक्ट कार्यक्रम, जाणून घ्या इस्लामपुरचे गणित

Islampur election 2024 : इस्लामपुर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांच्याविरोधात कोण उमेदवार असणार याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील उमेदवारीसाठी रस्सीखेच.
Islampur Vidhan sabha election 2024
Islampur Vidhan sabha election 2024sakal
Updated on

इस्लामपूर : विधानसभेचे नगारे वाजत असताना इस्लामपूर मतदारसंघात मात्र जयंत पाटील यांच्यासमोरचा पैलवान कोण, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. महायुतीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला की भाजपला, हा तिढा पहिल्यांदा सोडवावा लागेल. मात्र वरिष्ठ पातळीवरून उमेदवारावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. तेव्हा जयंत पाटील यांच्या विरोधात गतवेळचे भाजपचे उमेदवार निशिकांत पाटील, शिंदे शिवसेनेचे आनंदराव पवार की गौरव नायकवडी, यावर शिक्कामोर्तब होईल. जयंत पाटील नेहमीप्रमाणे विरोधकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची जबाबदारी ते सांभाळत राज्यभर दौरे करीत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.