गडचिरोली: महाराष्ट्राच्या राजकारणात काका- पुतण्याचे राजकारण बघितले आहे. मात्र, गडचिरोली विधानसभा मतदारसंघात मामा-भाच्यात लढत होणार आहे.
या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेले मामा (मनोहर पोरेटी) भाजपचा उमेदवार असलेला भाचा (डॉ. मिलिंद नरोटे) यांच्याशी लढणार आहेत. त्यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रामायण, महाभारत ही महाकाव्य सार्वकालिक मानली जातात. कारण त्यात वर्णिलेली परिस्थिती आपल्याला प्रत्येक काळात दिसून येते. त्यातही महाभारतातील स्थिती तर राजकारणात हमखास बघायला मिळते. महाभारत नात्यागोत्यातील पांडव कौरवांना एकमेकांशी लढावे लागले होते. सध्याचे राजकीय क्षेत्रही याला अपवाद नाही.