VBA Candidates: विधानसभेसाठी 'वंचित'कडून 10 उमेदवार जाहीर; सर्व उमेदवार मुस्लिम

Vanchit Bahujan Aghadi Candidates: विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने 10 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये विशेष असे की यातील सर्व उमेदवार मुस्लिम आहेत.
VBA Prakash Ambedkar
VBA Prakash Ambedkar esakal
Updated on

राज्यात येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान स्वबळावर निवडणूक लढवत असलेल्या वंचित बहुजन आघाडीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विधानसभेसाठी 10 नावांचे घोषणा केली आहे. वंचितने घोषित केलेल्या 10 उमेदवारांपैकी सर्व 10 जन मुस्लिम आहेत.

मे-जूनमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुत वंचित आघाडी पक्ष स्वतंत्रपणे लढला होता. त्यामध्ये त्यांना कोणतेही यश मिळाले नाही. असे असूनही आता विधानसभा निवडणुकीतही वंचित स्वबळावर लढणार आहे.

कोणाला मिळाली उमेदवारी?

  1. शहेजाद खान सलीम खान मलकापुर विधानसभा

  2. खतीब सैय्यद नातीकोद्दीन बाळापूर विधानसभा

  3. सय्यद समी सय्यद साहेबजान परभणी विधानसभा

  4. मो. जावेद मो. इसाक औरंगाबाद मध्य विधानसभा

  5. सय्यद गुलाम नबी सय्यद गफुर गंगापूर विधानसभा

  6. अयाज गुलजार मोलवी कल्याण पश्चिम विधानसभा

  7. अॅड. मोहम्मद अफरोज मुल्ला हडपसर विधानसभा

  8. इम्तियाज जाफर नदाफ माण विधानसभा

  9. आरिफ मोहम्मद अली पटेल शिरोळ विधानसभा

  10. आल्लाउद्दीन हयातचाँद काजी जागी

बुधवारी, काँग्रेस पक्षाच्या 10 मुस्लिम नेत्यांच्या गटाने VBA ने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले की त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून VBA मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान यापूर्वी वंचित आघाडीने राज्यातील विधानभा निवडणूकिसा 10 उमेदवारांची घोषणा केली होते. त्यामध्ये एका तृतीयपंथी उमेदवाराचा समावेश होता.

VBA Prakash Ambedkar
Maharashtra Assembly Elections: महाविकास आघाडीत जागावाटपावर तिढा! २४० ते २५० जागांवर सहमती, इतर जागांचं काय?

2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एमआयएम बरोबर युती केली होती. त्यानंतर दोन्ही निवडणुकांमध्ये या युतीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता.

मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम स्वतंत्र लढली होती. तर वंचित आघाडीही स्वबळावर लढली होती.

#ElectionWithSakal

VBA Prakash Ambedkar
Shirdi Sai baba: साईबाबा संस्थानला बेनामी देणग्यांवर द्यावा लागणार नाही कर, कोर्टाचा निर्णय!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.