नागपूर : विधानसभा २०२४ चा महासंग्राम होत असून या महासंग्रामात कोण विजयी होईल, कोणाला पराभवाचे तोंड पाहावे लागेल, हे येत्या २३ नोव्हेंबरलाच कळणार आहे. नागपूर जिल्ह्यात ही निवडणूक अनेक वैशिष्ट्यांनी गाजत आहे. जिल्ह्यात एकंदर १०० उमेदवार भाग्य आजमावीत असले तरी जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील मुख्य लढती महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी या दोघांतच होईल, अशी स्थिती आहे.