नागपूर : उमरेड मतदारसंघातील राजकारण हे कायम पारवे कुटुंबीयांभोवती फिरतं. भाजप, असो वा काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांना पारवे कुटुंबिय जवळचे वाटतात. या मतदारसंघात बौद्ध विरुद्ध हिंदू मतांना एकत्र करण्याचं राजकारण दोन्ही पक्षांकडून सुरु आहे. मात्र, आमदार राजू पारवे यांनी काँग्रेसला हात दाखवीत शिवसेनेत जय श्रीरामचा नारा दिला. यामुळं सध्या तरी पारवे यांचं देऊळ पाण्यात आहे.