पुणे - महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला असे सांगितले जात असले तरी अद्याप ४५ जागांवर खल सुरु आहे. या जागा सोडण्यावरून महायुतीतील स्थानिक पदाधिकारी आक्रमक असल्याने त्यावर निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे काही ठिकाणी जागांची अदलाबदल करावी लागणार आहे. त्यावर पुढील तीन चार दिवसात महायुतीचे नेते तोडगा काढून ही यादी दिल्लीला पाठवणार आहेत, अशी माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली.