Vinod Tawde Cash Distribution Allegations: नालासोपारा-विरार येथे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांना पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे (बविआ) नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना एका हॉटेलमध्ये घेरले असून, यावेळी पाच कोटी रुपये आणि दोन डायऱ्या जप्त करण्यात आल्याचा दावा केला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. याविरोधात महाराष्ट्रातील विरोधी नेत एकवटले आहे. महाराष्ट्रात भाजपचा खेळ खल्लास झाल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.