विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटप असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेरलं आहे. विरारच्या विवांत हाॅटेलमध्ये हा प्रकार सुरु आहे. यावर विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे, हाॅटलमध्ये आचारसंहितेदरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो. पैसे वाटल्याचा आरोप चुकीचा आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी आचारसंहितेचे काय नियम आहेत हे मी कार्यकर्त्यांना समजावून सांगत होतो. तेव्हा मी पैसे वाटतोय असा समज हितेंद्र ठाकूर यांना झाला. जर मी पैसे वाटल्याचे सीसीटिव्ही कॅमरे-यात दिसत असेल तर निवडणूक आयोगाने निष्पक्ष चौकशी करावी. असं तावडे म्हणाले.