राज्यात निवडणुकीचा प्रचार संपायला ७२ तास उरले आहेत. प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. या सगळ्यात राज्यभर फिरत असताना सामान्य माणसाची भावना समजून घेतली आहे. तर या निवडणुकीत महायुती स्पष्ट बहुमताच्या पलीकडे जाईल, असं चित्र दिसत आहे. लोकसभेला महायुतीला जागा कमी आल्या. त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये अनेक कल्पना सुरू झाल्या होत्या. लोकसभेला ४०० च्या पार या नाऱ्यामुळे ४ टक्के मतदार होता. ज्यांनी मतदान केलं नाही. मात्र ते यावेळी मतदान करतील. राज्याला स्पष्ट बहुमताच सरकार मिळेल ते महायुतीच असेल, असा विश्वास भाजप नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे.