Vivek Kolhe : कोल्हेंच्या पुनर्वसनावर शिक्कामोर्तब, अमित शहांची दिल्लीत भेट : पक्ष न सोडण्याचे संकेत

Vivek Kolhe : युवानेते विवेक कोल्हे यांनी अमित शहांसोबतच्या भेटीत भाजप सोडण्याचा निर्णय घेतला नाही. त्यांच्या पुनर्वसनाबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत
Vivek Kolhe
Vivek Kolhe , Amit Shah, Devendra Fadnavis sakal
Updated on

कोपरगाव : भाजप सोडायचा नाही. कोपरगाव विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असे स्पष्ट संकेत देत युवानेते विवेक कोल्हे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईमुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही नाट्यमय घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.