छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा उत्सव साजरा करतानाच लोकशाहीच्या उत्सवातही मोठ्या संख्येने मतदारांनी सहभागी व्हावे आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. जिल्ह्यात मतदारांची संख्या ३२ लाख २ हजार ७५१ एवढी झाल्याचेही त्यांनी सांगितले.