पाली : विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. आणि अशा वेळेला मतदारसंघातील कामांबाबत व प्रलंबित योजनांबाबत नागरिकांमध्ये मात्र असंतोष बघायला मिळत आहे. मग हा असंतोष व खदखद सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर पडत आहे. कोणी कविता पोस्ट करत आहे तर कोणी पोस्ट टाकून प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधत आहे.