छत्रपती संभाजीनगर : ‘‘पाहुणं... आम्ही मतदानासाठी आपल्याला कधी कॉल केला नाही. फक्त एवढ्या वेळेस आमचं ऐका पाहुणं. यंदा, तुम्ही कोणताही विचार करू नका. आपलं मत सोयऱ्यालाच टाका,’’ अशा आशयाच्या वारंवार येणाऱ्या कॉलने जिल्हाभरातील मतदारराजे त्रस्त झाले आहेत. यात अतिशयोक्ती म्हणजे प्रत्येकवेळी येणारा कॉल हा नवीन नातलगांकडून येत असल्याने तो उचलणे भाग पडत आहे.