Voter Documents : निवडणूक ओळखपत्र नाही? काळजी करू नका ! या दहा कागदपत्रांनीही करता येत मतदान, चेक करा लिस्ट

Voter Documents : तुमचे मतदान ओळखपत्र गहाळ झाले असेल तर काळजी करू नका या काही कागदपत्रांनी तुम्ही निश्चितपणे मतदान करू शकता.
vOTER ID CARD
vOTER ID CARDESAKAL
Updated on

10 Alternative Options Of Voter ID Card:

2024 च्या विधानसभा निवडणुकीची वातावरण निर्मिती होत आहे. निवडणुकीला सामोरे जाणारे उमेदवार आत्तापासूनच जोरदार तयारी करत आहेत. तर चौकात अन् गावच्या पारावर चर्चाही रंगल्या आहेत. मतदानाला सामोरे जाण्यासाठी मतदारही तयार होत आहेत. मतदारांची लिस्ट आणि मतदान कार्ड बनवण्यासाठी लगबग सुरू आहे.

काही लोक आपल्याकडे मतदान ओळखपत्र आहे असे म्हणून गप्प बसतात. ऐनवेळी ते सापडत नाही. मतदान ओळखपत्र असेल तरच मतदान करता येतं. आणि तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर काय करावं? असा प्रश्न पडला असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

vOTER ID CARD
Assembly Elections 2024 : विधानसभेला जिल्ह्यात वाढले ५५ हजार मतदार

अशावेळी तुम्ही इतर काही महत्वाची कागदपत्रे घेऊन मतदान करू शकता. भारत सरकारने अशा काही कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. जी वापरून तुम्ही मतदान करू शकता.  

याचा उद्देश इतकाच आहे की कुठलाही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये. त्यामुळे तुमचे मतदान ओळखपत्र गहाळ झाले असेल तर काळजी करू नका या काही कागदपत्रांनी तुम्ही निश्चितपणे मतदान करू शकता.

vOTER ID CARD
पदवीधर निवडणुकीसाठी अडीच लाख मतदार

निवडणूक आयोगानुसार, मतदान केंद्रांवर मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. मतदान करण्यासाठी तुम्हाला मतदार ओळखपत्र किंवा निवडणूक आयोगाद्वारे जारी केलेले कोणतेही अधिकृत ओळखपत्र दाखवावे लागेल. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) जारी केलेल्या सूचनांनुसार, तुम्ही मतदान ओळखपत्र नसतानाही निवडणुकीत मतदान करू शकता.

जोपर्यंत तुमचे नाव अधिकृत मतदार यादीत आहे तोपर्यंत तुम्ही मतदान करू शकता. तुम्ही मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यापूर्वी तुमचे नाव भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) अधिकृत मतदार यादीमध्ये असल्याची पडताळणी करणे आवश्यक आहे.

vOTER ID CARD
Bigg Boss Marathi Voting Trends: 'हा' सदस्य होणार घराबाहेर; मिळालेत सगळ्यात कमी वोट्स, बीबी मराठीला मिळणार टॉप ६ स्पर्धक

मतदान करण्यापूर्वी या यादीची पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे कारण या यादीतील तुमचे नाव मतदानासाठी तुमच्या पात्रतेची पुष्टी करते.

 

ही कागदपत्रे आहेत महत्त्वाची (Important Doccuments for Voting )

  • आधार कार्ड

  • मनरेगा जॉब कार्ड

  • बॅंक, पोस्ट ऑफिसकडून मिळालेले फोटो असलेले पासबुक

  • हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड

  • कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले स्मार्ट कार्ड,

  • ड्रायव्हिंग लायसन्स

  • पॅन कार्ड

  • NPR भारतीय पासपोर्ट अंतर्गत RGI द्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड

  • मतदाराचा फोटो असलेले पेन्शनची कागदपत्रे

  • भारतीय पासपोर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.