विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडीचा सुपडा साफ करत महायुतीला घवघवीत असं यश मिळाले आहे. 288 पैकी 230 जागांवर महायुतीचे उमेदवारी जिंकून आले. यात भाजप हा सगळ्यात जागा जागा जिंकणारा पक्ष ठरला. एकट्या भाजपला १३२ शिवसेना शिंदे गटाला ५७ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या ४१ जागा निवडून आल्या. यानंतर आता चर्चा आहे ती सत्तास्थापनेची आणि मुख्यमंत्रीपदाची.
आपलाच मुख्यमंत्री व्हावा यासाठी तिनही पक्षात चढाओढ सुरु आहे, भाजपच्या सर्वाधिक जागा आल्याने मुख्यमंत्री पद त्यांच्याच वाट्याला जाईल याची दाट शक्यता आहे. पण मित्र पक्षांशिवाय सत्ता स्थापन करणं देखील तितकंच कठिण आहे आणि महायुती टिकवून ठेवण्याचं आव्हान देखील भाजपसमोर आहे आणि यातचं राज्यात पुन्हा एकदा बिहार पॅटर्न लागू करण्याची मागणी सुरू आहे. आणि खास करून शिवसेना शिंदे गटाकडून? त्यामुळे बिहार पॅटर्न नेमका काय? आणि तो महाराष्ट्रात पुन्हा लागू का होऊ शकत नाही? ते जाणून घेऊ