नागपूर : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला उत्तर नागपूर मतदारसंघ. सर्वाधिक २६ उमेदवार या मतदारसंघात रिंगणात आहेत. यापैकी ११ अपक्ष .आणि कॉंग्रेस, भाजप आणि बसपा सोडल्यास ११ लहान पक्षांचे उमेदवारांनी शड्डू ठोकला आहेत. उत्तर नागपुरात अपक्ष उमेदवार आणि लहान पक्षाच्या उमेदवारांनी मोठ्या पक्षांची चिंता वाढवली आहे. प्रमुख उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघवडण्यात अपक्षांचा मोलाचा वाटा राहण्याची शक्यता आहे.उत्तर नागपुरात मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात असलेले बहुतांश अपक्ष उमेदवार हे आंबेडकरी चळवळीतील आहेत. यामुळे त्यांचा मोहल्लाच नव्हे, तर एकूणच उत्तरेत प्रभाव बऱ्यापैकी आहे. यामुळे चळवळीशी बांधिलकी असलेल्या अपक्ष उमेदवारांना सहानुभूती म्हणून ११ उमेदवारांनी किमान २०० ते २००० पर्यंत मते घेतली तर लढतीतील प्रमुख उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडू शकते. .२०१९ मध्ये कॉंग्रेसचे नितीन राऊत यांनी २० हजार ९४४ मतांनी विजय मिळविला होता. मात्र यावेळी संघपाल उपरे, अतुल खोब्रागडे, रमेश फुले या कार्यकर्त्यांसह वंचित, बसपा, एमआयएम या छोट्या पक्षाच्या उमेदवारांचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे केवळ कॉंग्रेसच नव्हे तर भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.मतदारसंघातील अपक्ष उमेदवारअतुलकुमार दादा खोब्रागडे, संघपाल हरीष उपरे, अथांग अनिल करोडे, ॲड. अश्विन विनायक जवादे, अशोक महादेव वाघमारे, डॉ. कुणाल ढोके, रमेश बाबुराव फुले, विश्वास चंद्रभान पाटील, श्रीधर भोजराज तागडे, सुनील काशीनाथ मेश्राम, हरीश छोटेलाल नक्के..उमेदवारांनी घेतला धसकाकॉंग्रेसचे डॉ. नितीन काशिनाथ राऊत, भाजपचे डॉ. मिलिंद पांडुरंग माने मीच निवडून येणार असा दावा करीत असले तरी अपक्षांसह लहान पक्षाच्या उमेदवारांचा धसका या प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांशी ‘सकाळ’ प्रतिनिधीने संवाद साधला असता जाणवला. त्यामुळे प्रचार जसाजसा पुढे जाईल, तसे या अपक्षांबद्दलची चिंता दूर होणार की वाढणार? हे दिसून येणार आहे.पक्षनिहाय असे आहे उमेदवारउमेदवार पक्षमनोज दशरथ सांगोळे बहुजन समाज पक्षमुरलीधर काशीनाथ मेश्राम वंचित बहुजन आघाडीपंजाबराव गुजाराम मेश्राम बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी.किर्ती दीपक डोंगरे ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनकुणाल प्रेमानंद जनबंधू मायनॉरिटीज डेमॉक्रॅटिक पार्टीअमोक खुशाल नगरारे मेरा अधिकार राष्ट्रीय दलगिरीश राखडू सहारे बळीराजा पार्टीगुणवंत हरिचंद्र सोमकुंवर भीम सेनाचंद्रकांत प्रल्हाद रामटेके रिपब्लिकन पक्ष-खोरिपॲड. त्रिशील विजय खोब्रागडे आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाप्रगती इंदलकुमार गौरखेडे जय विदर्भ पार्टीसुधीर दयानंद पाटील देश जनहित पार्टीसंतोष तुळशीराम चव्हाण विकास इंडिया पार्टी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.