Gangapur Assembly Elections : बंब चौकार मारणार की विकेट जाणार? महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या अधिक
Gangapur Vidhan Sabha Elections 2024 : गंगापूर मतदारसंघात भाजपने आमदार प्रशांत बंब यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीत कोण उमेदवार असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही, त्यामुळे चुरशीच्या लढतीची शक्यता आहे.
गंगापूर : महायुतीतील घटक पक्ष भाजपच्या वतीने विधानसभेच्या गंगापूर मतदारसंघात आमदार प्रशांत बंब यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कुणाला सुटणार हा तिढा सुटलेला नाही.