Deva Bhau Song : विधानसभेसाठी फडणवीसांचं ब्रँडिंग! 'देवा भाऊ' गाणं लॉन्च, काय आहे खासियत?

हे गाण वाजवूनच भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis
Updated on

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाजपकडून जोरदार ब्रँडिंग सुरु करण्यात आलं आहे. यासाठी देवा भाऊ नवाचं नवकोरं गाण लॉन्च करण्यात आलं आहे. हे गाण वाजवूनच भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. या गाण्यात नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: फडणवीसांची ओरडून भाषण करण्याची सवय बदलली याचं कारण ठरले नाना पाटेकर; काय आहे किस्सा?

देवा भाऊ या शिर्षकाखाली रिलिज केलेल्या या गाण्याचा ४ मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या गाण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी २०१४ ते २०१९ त्यानंतर २०२२ मध्ये सत्तेत आल्यानंतर काय काम केली हे सांगण्यात आलं आहे. या कामांमध्ये मुंबईतील कोस्टल रोड, अटल सेतू, मुंबई ते नागपूर समृद्धी एक्स्प्रेस हावये, मुंबईतील मेट्रो रेल्वेचं जाळं तसंच इतर पायाभूत सुविधांचे प्रोजेक्ट यांचा समावेश आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळची व्यक्ती असल्यानं पंतप्रधानांसोबत परदेशी मान्यवरांसोबतचे फडणवीसांचे फोटो आणि व्हिडिओ यात पाहायला मिळतात.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: मंत्रालयात अज्ञात महिलेकडून तोडफोडीचा प्रयत्न!| Politics | Marathi news

दिवसरात्र, एकच लक्ष्य, एकच ध्यास, देश आणि धर्म, जीवन आणि श्वास...छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा पुढे चालवायची आहे. महाराष्ट्राचा गौरव वाढवायचा आहे, अशा पंक्ती फडणवीसांच्या गौरवगीतात ऐकायला मिळतात. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महाराष्ट्राच्या इतर प्रेरणास्थान असलेल्या महान व्यक्तींना पुष्पांजली वाहताना फडणवीस दिसत आहेत. याशिवाय हिंदुत्वाचं प्रतिक म्हणून फडणवीस मंदिरात पुजा आणि शिवभक्ती करताना दाखवण्यात आलं आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पुढील पाच वर्षे महायुतीच सत्तेत : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकसभेला फटका अन् विधानसभेची चिंता

याच वर्षी मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. हा पराभव जिव्हारी लागल्यानं फडणवीसांनी आपण राजीनामा देणार असल्याचंही म्हटलं होतं. पण भाजपच्या हायकमांडनं त्यांना सबुरीचा सल्ला देत केंद्रीय नेतृत्वाचा त्यांच्यावर विश्वास असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं हा राजीनाम्याचा विषय मागे पडला आणि फडणवीस पुन्हा कामाला लागले.

आता येत्या काही दिवसांतच विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असल्यानं या निवडणुकीत कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून फडणवीसांनी यापूर्वी राज्यात काय काय कामं केली ते सांगताना 'देवा भाऊ' या गाण्याचा प्रयोग करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.