पुसद (जि. यवतमाळ) : महाराष्ट्राच्या राजकारणातील नावाजलेल्या नाईक घराण्यातील आमदार इंद्रनील नाईक व ययाती नाईक या दोन सख्ख्या भावांतील आमदारकीचा संघर्ष त्यांचे काका माजी मंत्री अविनाश वसंतराव नाईक यांच्या शिष्टाईमुळे टळला आहे. ययाती नाईक हे पुसद विधानसभा निवडणुकीतून माघार घेणार असून कारंजा मतदारसंघात समनक जनता पक्षाकडून लढणार आहेत.