येवला: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने अखेर मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिंदे यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून भुजबळांच्या विरोधात जरांगे पॅटर्नची खेळी खेळल्याचे सांगितले जाते. दरम्यान २००४ मधील भुजबळांचे येथील निमंत्रक असलेले शिंदेच प्रतिस्पर्धी उमेदवार झाले आहे.