Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, हरयाणा, झारखंड विधानसभेची निवडणूक 'या' तारखेला होणार जाहीर?

निवडणूक आयोगानं या विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha
Maharashtra Vidhan Sabha
Updated on

मुंबई : लोकसभा निवडणुकीसोबतच जम्मू आणि काश्मीर विधानसभेची निवडणूक लागेल अशी अपेक्षा होती पण ती झाली नाही. पण आता याची जोरदार तयारी निवडणूक आयोगाकडून सुरु असून यासाठी तारीखही निश्चित झाल्याची माहिती मिळतेय. कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक असणार आहे. विशेष म्हणजे याबरोबरच महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंडची निवडणूक देखील जाहीर होणार आहे. (Maharashtra J&K Vidhan Sabha Election 2024 with Haryana Jharkhand may announced on 20 August 2024)

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगानं महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर, हरयाणा आणि झारखंड या चार राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना गुरुवारी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून निवडणुकीच्या संभाव्य तारखा देण्याची मागणी केली आहे. यानंतर शुक्रवारी काढलेल्या एका निवेदनात, निवडणूक आयोगानं सांगितले की, मतदान केंद्रांची ठिकाणं अधिक सोयीची आणि तर्कसंगत असावीत यासाठी निवडणूक पूर्व विशेष मोहिम 25 जूनपासून सुरू होईल.

जुलैच्या कट-ऑफ तारखेसह मतदार याद्या अद्ययावत केल्या जातील. 25 जुलै रोजी प्रारूप याद्या प्रसिद्ध केल्या जातील, त्यानंतर मतदारांना 9 ऑगस्टपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. त्यानंतर अंतिम मतदार यादी वेळापत्रकानुसार 20 ऑगस्टपर्यंत जाहीर केली जाईल.

Maharashtra Vidhan Sabha
Pankaja Munde: '...सरकारने स्पष्ट करावे', लक्ष्मण हाकेंना सरकारी शिष्टमंडळ भेटताच पंकजा मुंडेंनी केली मागणी

दरम्यान, 2018 मध्ये बरखास्त झाल्यापासून जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात नाही, तर हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 11 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर आणि 5 जानेवारी 2025 रोजी संपत आहे. त्यामुळं या कार्यकाळांपूर्वीच निवडणुका पूर्ण कराव्या लागतील.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जम्मू आणि काश्मीरमधील लोकांचा मोठा सहभाग पाहून आयोगानं जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील मतदार याद्या १ जुलै २०२४ पर्यंत अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत,” असं आयोगानं म्हटलं आहे.

Maharashtra Vidhan Sabha
Police Bharti 2024: जिथे पाऊस तिथे पोलीस भरती पुढे ढकलली; देवेंद्र फडणवीसांची मोठी माहिती

कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना, सुप्रीम कोर्टानं गेल्या वर्षी निवडणूक आयोगाला जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत घेण्याचे आदेश दिले होते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितलं की, निवडणूक पॅनेल निवडणुका घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करेल. लोकसभा निवडणुकीत जम्मू-काश्मीरच्या पाच लोकसभा मतदारसंघात एकूण 58.58 टक्के मतदान झालं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.