मिझोरममध्ये सत्तापालट झाली आहे. लालदुहोमा यांच्या नेतृत्त्वाखाली झेडपीएम पक्षाने 27 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. सत्ताधारी MNF पक्षाला केवळ 10 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. सर्व 40 जागा लढवलेल्या काँग्रेसला तर अवघ्या एका ठिकाणी यश मिळालं आहे. भाजपला दोन ठिकाणी विजय प्राप्त झाला आहे.
काँग्रेसने मिझोरममध्ये सर्व 40 जागा लढवल्या होत्या. मात्र यापैकी केवळ एका जागेवर काँग्रेसला विजय मिळाला आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालानुसार, मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांचा झेडपीएमच्या लालथनसांगा यांच्याकडून ऐझॉल पूर्व-१ जागा २,१०१ मतांनी पराभूत झाले आहेत.
आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, झेडपीएमने 26 जागांवर विजय मिळवला आहे. आणखी एका ठिकाणी ZPM आघाडीवर आहे.
MNF पक्षाला सात जागा मिळाल्या असून, आणखी तीन ठिकाणी ते आघाडीवर आहेत.
भाजपला दोन जागांवर यश मिळालं आहे.
काँग्रेस एका ठिकाणी आघाडीवर आहे.
झेडपीएम पक्षाने 21 जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा गाठला आहे. अजूनही ZPM आणखी सहा ठिकाणी आघाडीवर आहे. त्यामुळे राज्यात सत्ता बदल झाल्याचं निश्चित झालं आहे.
MNF ने सात जागांवर विजय मिळवला असून, त्यांची आणखी तीन जागांवर आघाडी कायम आहे. भाजपला दोन जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस एका ठिकाणी आघाडीवर आहे.
या निवडणुकीत झेडपीएम सत्तेत येण्याची चिन्हं दिसत असतानाच, पक्षाचं मनोबल आणखी वाढलं आहे. मुख्यमंत्री पदाचे उमेदवार लालदुहोमा हे सेरछिप मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांना 8,314 मतं मिळाली.
मिझोरममध्ये एमएनएफ पक्षाने अखेर खातं उघडलं आहे. आतापर्यंत तीन जागांवर त्यांना विजय प्राप्त झाला आहे. आणखी सात जागांवर MNF आघाडीवर आहे. ऐझवाल पूर्व-1 मतदारसंघातून मुख्यमंत्री झोरमथंगा हे पिछाडीवर आहेत.
मिझोरम राज्यात भाजपने आपलं खातं उघडलं आहे. पालक मतदारसंघातून भाजप उमेदवार विजयी झाला आहे. राज्यात भाजप आणखी एका जागेवर पुढे आहे.
दरम्यान, झेडपीएमने आठ जागांवर विजय मिळवला असून आणखी 18 जागांवर ते पुढे आहेत.
सकाळी अकरा वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, झेडपीएम 6 जागांवर विजयी झालं आहे. सोबतच, 20 जागांवर त्यांची आघाडी कायम आहे. MNF 11 जागांवर, भाजप 2 जागांवर तर काँग्रेस एका जागेवर पुढे आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार झेडपीएमकडे बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त आघाडी मिळाली आहे. "हे निकाल अपेक्षितच होते, त्यामुळे मला जास्त आश्चर्य वाटत नाहीये... आपण निकालाची वाट पाहूया.." असं मत पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार लालदुहोमा यांनी व्यक्त केलं.
झेडपीएमने मिझोरममध्ये पहिलं खातं उघडलं आहे. तुईचंग मतदारसंघातून ZPM उमेदवार विजयी झाले आहेत.
झेडपीएम आणि एमएनएफ सोबतच काँग्रेसनेही मिझोरममध्ये सर्व 40 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे याठिकाणी तिरंगी लढत पहायला मिळणार असं वाटत होतं. मात्र, आता सुरुवातीच्या कलांनंतर याठिकाणी काँग्रेसचा बार फुसका निघाल्याचं दिसत आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत काँग्रेसला केवळ दोन जागांवर आघाडी मिळाली आहे.
सध्या ZPM 25 आणि MNF 9 जागांवर पुढे आहे. भाजपकडे तीन जागांची आघाडी आहे.
मिझोरममध्ये सत्ता बदल होण्याची चिन्हं सुरुवातीच्या कलांमध्ये दिसत आहेत. ZPM पक्ष सध्या 21 जागांवर पुढे आहे. बहुमतासाठी एवढ्याच जागांची गरज आहे. सध्या सत्तेत असणारा MNF 14 ठिकाणी आघाडीवर आहे.
मिझोरममध्ये झेडपीएम पुन्हा एकदा शर्यतीत आलं आहे. सध्या ZPM 16 जागांवर पुढे आहे. तर सत्तेत असणारी MNF ही 11 जागांवर पुढे आहे. काँग्रेस पाच ठिकाणी आघाडीवर आहे. भाजपला देखील एका जागेवर आघाडी मिळाली आहे.
पोस्टल बॅलटची मोजणी पूर्ण झाली असून, आतापर्यंत १० ठिकाणी एमएनएफ आघाडीवर आहे. झेडपीएम 9 ठिकाणी पुढे असून, काँग्रेसकडे पाच जागांची आघाडी आहे. आता ईव्हीएम मशीनवरील मतांची मोजणी सुरू होणार आहे.
मिझोरममध्ये पहिल्या अर्ध्या तासामध्ये काही कल हाती आले आहेत. झेडपीएम सात ठिकाणी आघाडीवर आहे, तर सध्या सत्तेत असणारा MNF हा पक्ष चार जागांवर पुढे आहे.
मिझोरममध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काही वेळातच पहिले कल समोर येतील.
एमएनएफ, झेडपीएम आणि काँग्रेस हे सर्व पक्ष 40-40 जागांवर उभे होते. भाजप 13 जागांवर तर आप 4 जागांवर लढत आहे. याव्यतिरिक्त 17 अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठीची तयारी वेगात सुरू आहे. काही मिनिटांमध्येच मतमोजणी सुरू होणार आहे. त्यानंतर लगेच कल येण्यास सुरूवात होईल.
Mizoram Assembly Election Result LIVE : मिझोराममध्ये विधानसभेच्या 40 जागांसाठी 7 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं होतं. यानंतर आता 4 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडली.
मिझोरममध्ये सत्तापालट झाली आहे. लालदुहोमा यांच्या नेतृत्त्वाखाली झेडपीएम पक्षाने 27 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. सत्ताधारी MNF पक्षाला केवळ 10 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. सर्व 40 जागा लढवलेल्या काँग्रेसला तर अवघ्या एका ठिकाणी यश मिळालं आहे. भाजपला दोन ठिकाणी विजय प्राप्त झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.