चार राज्यात भाजपची बाजी; पंजाबमध्ये आपची बल्ले-बल्ले; वाचा सविस्तर

Assembly Election Result 2022
Assembly Election Result 2022
Updated on
Summary

देशात पाच राज्यातील निवडणुकांसाठी मतदानानंतर आज मतमोजणी (Assembly Election Result 2022) सुरु आहे.

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये अद्याप काही ठिकणी मतमोजणी सुरु असून जवळपास चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये पाच पैकी चार राज्यात भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर पंजाबमध्ये आपने बाजी मारली आहे. उत्तराखंडमध्ये आजी-माजी मुख्यमंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला. पंजाबमध्येही आम आदमी पक्षाच्या वादळात दिग्गजांची वाताहत झाली.

मणिपूरमध्ये भाजपची बाजी

मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागांसाठीचे निकाल हाती येऊ लागेल आहेत. राज्यात पुन्हा एकदा भाजप (BJP) सत्तेच्या जवळ जाताना दिसतंय. सुरुवातीच्या कलानुसार भाजपनं आतापर्यंत 60 पैकी 28 जागी जिंकल्या आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांत भाजप 28 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 09, एनपीपी 09 आणि इतर 08 जागांवर आघाडीवर आहेत.

Assembly Election Result 2022
विश्लेषण : मणिपूरमध्ये भाजपाचा ‘मास्टरस्ट्रोक’, काँग्रेसला घरघर

उत्तराखंडमध्ये आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव

उत्तराखंडमध्ये भाजपा बहुमताचा आकडा ओलांडताना दिसत आहे. मात्र भाजपची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे. माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी या दोघांचाही पराभव झाला आहे.

Assembly Election Result 2022
चार राज्यातील भाजपच्या विजयावर विरोधकांची भूमिका काय? शरद पवार म्हणतात...

गोव्यात भाजप सत्ता स्थापन करणार - देवेंद्र फडणवीस

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपने २० जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या क्रमांकाच्या १० जागा काँग्रेसने मिळवल्या आहेत. अपक्ष ३ उमेदवार विजयी झाले असून मगोपला २, आपला २ आणि इतर दोन असे संख्याबळ आहे. यात अपक्ष ३ आणि मगोपने भाजपला पाठिंबा दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. वाचा अपडेट्स

उत्तर प्रदेशात मोदींच्या मतदारसंघातूनच भाजप उमेदवार पिछाडीवर -

पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीमधून भाजपचे उमेदवार निलकंठ तिवारी पिछाडीवर असून समाजवादीचे कामेश्वर दीक्षित आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशातील लाइव्ह अपडेट वाचण्यासाठी क्लिक करा

Assembly Election result 2022
Assembly Election result 2022

पंजाबमध्ये चन्नी, सिद्धू, कॅप्टन पिछाडीवर

सध्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, नवज्योत सिंग सिद्धू, कॅप्टन अमरिंदर सिंग हे पिछाडीवर आहेत. हे सर्व मोठे चेहरे पिछाडीवर असल्याने या निकालांबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. पंजाबमधील निकालाच्या घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा

पणजीतून उत्पल पर्रिकर यांचा पराभव

पणजीत दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पलने (Utpal Parrikar) बंडखोरी केल्याने देशाचे लक्ष येथे लागले होते. भाजपचे उमेदवार बाबुश मोन्सेरात व अपक्ष उत्पल यांच्यातच तुल्यबळ लढत होती. गेल्या वेळी मोन्सेरात अवघ्या १७५८ मतांनी विजयी झाले होते. पणजीचे दोनदा आयुक्त राहिलेले सनदी अधिकारी एल्विस गोम्स कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. गोव्यातील निवडणुकीचे अपडेट वाचा

Assembly Election Result 2022
पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा 'मान' आम आदमीला
  • पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर गुरुवारी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी 50,000 हून अधिक अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी पाच राज्यांमध्ये 650 हून अधिक मतमोजणी निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत.

Assembly Election Result 2022
UP Results 2022 Live: जनतेचा कौल नम्रतेने स्विकारतो - राहुल गांधी

उत्तर प्रदेशात योगी इतिहास घडवणार का?

उत्तर प्रदेशात सात टप्प्यात मतदान पार पडले आहे. भाजपने यावेळीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना पुन्हा संधी दिली आहे. २०१७ च्या निवडणुकी भाजपने (BJP) ४०३ पैकी ३१२ जागा मिळवल्या होत्या. तर भाजपनंतर समाजवादी पक्षाने ४७ आणि बसपाने १९ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला फक्त ७ जागाच राखता आल्या होत्या.

Assembly Election Result 2022
उत्तराखंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत; कोण होणार मुख्यमंत्री?

काँग्रेस पंजाबचा गड राखणार का?

पंजाबमध्ये (Punjab) २०१७ मध्ये काँग्रेसने (Congress) बहुमत मिळवलं होतं. काँग्रेसनं ११७ पैकी ७७ जागा जिंकल्या होत्या. तर आम आदमी पार्टीने २० जागा मिळवल्या होत्या. याशिवाय अकाली दलाला १५ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपने ३ जागा जिंकल्या होत्या. पंजाबमध्ये निवडणुकी आधी अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. यामध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला. त्यानंतर चरणजित सिंग चन्नी मुख्यमंत्री झाले. काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून त्यांच्याच नावाची घोषणा केली आहे.

उत्तराखंडमध्ये निवडणूकपूर्व बदल भाजपच्या पथ्यावर?

उत्तराखंडमध्ये भाजपने पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर केलं आहे. २०१७ मध्ये भाजपने उत्तराखंडमध्ये ७० पैकी ५६ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला ११ जागा राखता आल्या होत्या. भाजपने निवडणुकीआधी मुख्यमंत्री बदलल्याचा फायदा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गोव्यात पुन्हा भाजप?

गोव्यात सध्या मुख्यमंत्री असलेल्या प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढत आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपला ४० पैकी १३ जागाच जिंकता आल्या होत्या. तर काँग्रेसने सर्वाधिक १७ जागा जिंकल्या होत्या.

भाजप बहुमताचा आकडा गाठणार का?

मणिपूरमध्ये मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्याच नेतृत्वाखाली राज्यात भाजप पुन्हा निवडणूक लढवत आहे. भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीत ६० पैकी २१ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला २८ जागा मिळाल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()