सेनेला ३ राज्यांत भोपळा, निकालानं राऊतांच्या दाव्याची काढली हवा

Shivsena Losses UP Goa Manipur Election 2022
Shivsena Losses UP Goa Manipur Election 2022e sakal
Updated on

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देशाच्या राजकारणात जातील, असा दावा करत संजय राऊतांनी (Sanjay Raut) महाराष्ट्राबाहेरील तीन राज्यांत लढण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), गोवा (Goa) आणि मणिपूरमध्ये (Manipur) त्यांनी नशिब आजमावलं. पण, तिन्ही राज्यांमध्ये शिवसेनेला भोपळा मिळाला आहे. त्यांना साधं खातंही उघडता आलं नाही.

Shivsena Losses UP Goa Manipur Election 2022
उत्तर प्रदेशात ३७ वर्षांनंतर इतिहास घडणार? योगी मोडणार सर्व रेकॉर्ड

शिवसेनेने उत्तर प्रदेशात तब्बल ६० जागांवर उमेदवार दिले होते. पण, निवडणूक आयोगाने १९ उमेदवारांचा अर्ज नाकारला. त्यानंतर शिवसेनेने ४१ जागा लढवल्या. त्यासाठी खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत यांनी उत्तर प्रदेशात प्रचार देखील केला. उत्तर प्रदेशची जनता शिवसेनेच्या पाठिशी आहे आणि शिवसेना मुंबईतील उत्तर भारतीयांचा पाठिशी आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. तसेच उत्तर प्रदेशातून शिवसेनेचा मंत्री बनेल, असा दावा संजय राऊतांनी केला होता. पण, त्यांचे दावे फोल ठरलेले दिसतात. कारण, ४१ पैकी एकही जागा शिवसेनेला मिळवता आली नाही.

खासदार अरविंद सावंत, मुंबईतील उत्तर भारतीयांचा मुद्दा उत्तर प्रदेशात प्रभावी ठरेल असा विचार करत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील उत्तर प्रदेशात प्रचारासाठी गेल्या होत्या. शिवाय शिवसेना उत्तर प्रदेशसाठी काही नवीन नव्हती. यापूर्वी त्यांचा एक आमदार उत्तर प्रदेशातून निवडून आला आहे. तसेच हिंदूत्वावरून शिवसेना आणि उत्तर प्रदेश यांचं एक नातं आहेच. त्यामुळे इथं आपल्याला विजय मिळविता येईल, असं स्वप्न शिवसेनेनं पाहिलं. पण, काही क्षणात ते उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण, सेनेला एकही जागा मिळवता आली नाही.

गोव्यात 'आप'ला २ जागा, पण सेनेला भोपळा -

गोव्यात संजय राऊत स्वतः तळ ठोकून बसले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत काही जागा लढवल्या होत्या. इथं भाजपचा सुपडासाफ होईल असा दावा राऊतांनी केला होता. पण, त्यांचा दावा फोल ठरला असून गोव्यातही सेनेला खातं उघडता आलं नाही. दुसरीकडे गोव्यापासून दूर असलेलं राज्य म्हणजे दिल्लीतून आलेल्या केजरीवालांच्या 'आप'ला दोन जागा जिंकता आल्या. पण, महाराष्ट्र जवळ असूनही सेनेला एकही जागा जिंकता आली नाही.

मणिपूरमध्येही पदरी निराशा -

शिवसेनेने मणिपूर विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच नशिब आजमावलं. या राज्यात सेनेने एकूण ९ जागा लढवल्या होत्या. इतकंच नाहीतर मणिपूरचे माजी मुख्यमंत्री आर. के. सूरज सिंग यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तरीही शिवसेनेला भोपळा मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()