उत्तराखंड : हरिद्वारला ‘योगा’ची आंतरराष्ट्रीय राजधानी; भाजपचे ‘दृष्टिपत्र

उत्तराखंड विधानसभेसाठी भाजपने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशित केलेला जाहीरनामा हा उत्तराखंड विकास केंद्रित असल्याचे म्हटले आहे.
Uttarakhand BJP Manifesto
Uttarakhand BJP ManifestoSakal
Updated on
Summary

उत्तराखंड विधानसभेसाठी भाजपने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशित केलेला जाहीरनामा हा उत्तराखंड विकास केंद्रित असल्याचे म्हटले आहे.

डेहराडून - राज्यातील चार धाम प्रकल्पाचा विस्तार, मोक्षदा तीर्थयात्रा योजनेनुसार ज्येष्ठांना दहा हजार रुपयांपर्यंत अंशदान, हरिद्वारला (Haridwar) योगाची (Yoga) आंतरराष्ट्रीय राजधानी, (International Capital) लव्ह जिहादवर बंदी आणणे, राज्यातील ४५ नवीन ठिकाणांना पर्यटनस्थळ (Tourism Place) म्हणून विकसित (Develope) करणे यासारखी आश्‍वासन देणारा भाजपचा (BJP) दृष्टिपत्र जाहीरनामा (Manifesto) आज जनतेसमोर सादर झाला.

उत्तराखंड विधानसभेसाठी भाजपने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशित केलेला जाहीरनामा हा उत्तराखंड विकास केंद्रित असल्याचे म्हटले आहे. गडकरी यांनी या जाहीरनाम्याचे लोकार्पण करत असल्याचे सांगत प्रत्येक घटकाचा विचार केल्याचे म्हटले आहे. उत्तराखंड ही देवाची आणि वीर जवानांची भूमी आहे. ‘दृष्टीपत्र’ हे उत्तराखंडच्या विकासाची दृष्टी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाबरोबरच उत्तराखंडमध्येही कामे झाली आहेत. सात वर्षात राज्यात ५० लाख कोटींची कामे केल्याचे गडकरी म्हणाले. या देशात पैशाची नाही पण दृष्टीचा अभाव असल्याचे त्यांनी नमूद केले.

Uttarakhand BJP Manifesto
प्रत्येकवेळी आमदार बदलणारे चार मतदारसंघ, यंदा भाजप-काँग्रेस बदलणार इतिहास?

देशातील आघाडीचे राज्य करणार

भाजपचा जाहीरनामा ‘दृष्टीपत्र’ चे समितीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक म्हणाले, की निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच शेवटच्या गावातील व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून तयार केलेल्या दृष्टिपत्रासाठी लोकांच्या सूचना मागवल्या. पक्षाने राज्यातील ७० विधानसभा क्षेत्रात जाऊन आणि ऑनलाइन माध्यमातून ७८ हजार सूचना गोळा केल्या. या माहितीच्या आधारे सर्वंकष जाहीरनामा तयार केल्याचे त्यांनी म्हटले आहे. उत्तराखंड २०२५ पर्यंत देशातील आघाडीचे राज्य करण्याचा दृष्टीने जाहीरनामा तयार केल्याचे म्हटले आहे.

जाहीरनाम्यात काय?

  • हरिद्वारला ‘योगा’ची आंतरराष्ट्रीय राजधानी करणार

  • पोलिस दलाचे सक्षमीकरण करण्याबरोबरच कायदा सुव्यवस्थेत सुधारणा

  • आरोग्य सुविधांचा विस्तार, प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज

  • शेतकऱ्यांना आठ हजाराची मदत. प्रत्येक ब्लॉकमध्ये शेतकरी बाजार

  • लव्ह जिहादवर बंदी आणणार. महिला पोलिस ठाण्याची संख्या दुप्पट करणार

  • युवकांच्या कौशल्य विकासाला स्वयंरोजगाराशी जोडणार

  • राज्यात ४५ नवीन ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार

  • बीपीएल कुटुंबीयांच्या प्रमुखास तीन हजार

  • माजी सैनिकांसाठी सीमाभागात रहिवास करण्यासाठी मदत करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.