Pune Election: आघाडी झाली तरी फरफट नको, शिवसैनिकांची भूमिका

निवडणूक स्वबळावर लढावी अशी भूमिका काही शिवसैनिकांनी मांडली आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal
Updated on

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणूकीसाठी प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने प्रत्येक प्रभागातील शिवसैनिकांची मते जाणून घेऊन तेथील पक्षाची शक्ती आजमविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. निवडणूक स्वबळावर लढावी अशी भूमिका काही शिवसैनिकांनी मांडली आहे. तर नगरसेवकांची संख्या वाढविण्यासाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करावी पण सन्मानाने करावी अशी मतेही व्यक्त केली आहेत. (Pune Corporation Election Updates 2022)

राज्यात आघाडी सरकार आहे, पण पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हे तीन पक्ष एकत्र लढतील की नाही हे स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये आघाडीच्या दृष्टीने एक बैठक सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेली होती, पण त्यानंतर त्यामध्ये फार काही घडले नाही. प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रभागरचना आमच्यासाठी पोषक असून १२२ नगरसेवक स्वबळावर निवडून येतील त्यामुळे आघाडी नको अशी भूमिका मांडली. यानंतर शिवसेनेने देखील सावध भूमिका घेऊन बैठका सुरू केल्या आहेत.

Pune Municipal Corporation
Pune Election: प्रभागरचनेवर होणार २४ व २५ फेब्रुवारीला सुनावणी

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांच्या उपस्थितीमध्ये प्रभागनिहाय बैठका सुरू आहेत. नव्या प्रभागरचनेत शिवसेनेसाठी फायदेशीर ठरणारा भाग कोणता आहे, नव्याने आलेला भाग कोणता, शिवसेनेच्या हक्काचा मतदारांची विभागणी कोणत्या भागात झाली आहे, इतर पक्षांची स्थिती काय आहे? ही माहिती संकलित केली जात आहे. त्याचवेळी काही शिवसैनिकांनी स्पष्टपणे स्वबळावर लढावे असे सांगितले आहे.

तर काहींना आघाडी करावी पण जागा वाटप करताना शिवसेनेची फरफट होऊ नये, सन्मानपूर्वक जागा मिळाल्या पाहिजेत असे मत सांगितले आहे. आत्तापर्यंत पर्वती, हडपसर, वडगावशेरी, कोथरूड, शिवाजीनगर, कसबा या मतदारसंघातील पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांशी चर्चा झाली आहे, रविवारी आम्हाला बोलावले आहे, असे शिवसैनिकांनी सांगितले.

‘‘प्रभागरचनेनंतर प्रत्येक प्रभागातील शिवसैनिकांची मते जाणून घेतली आहे. ५८ पैकी ४० प्रभागांबद्दल चर्चा झाली आहे. खडकवासला, कॅन्टोन्मेंट आणि पुरंदरचा मतदारसंघातील २० प्रभागांची बैठक पुढील दोन दिवसात होतील. त्यानंतर पुण्यातील महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करून त्याचा अहवाल मुंबईला वरिष्ठांकडे पाठवला जाईल. काहींनी आघाडी करावी व काहींना स्वबळावर लढावे असे सांगितले पण त्याबाबत निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील.’’

- संजय मोरे, शहरप्रमुख, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.