Controversial Chief Minister : आर. गुंडूराव राज्यातील सर्वात वादग्रस्त मुख्यमंत्री

आर. गुंडूराव यांच्या काळात प्रशासनात कन्नड भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर सुरु झाला. तसेच निपाणी, नरगुंद, नवलगुंद येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला. त्यात अनेक शेतकरी ठार झाले.
Gundu rao and dinesh gundu rao
Gundu rao and dinesh gundu raosakal
Updated on
Summary

आर. गुंडूराव यांच्या काळात प्रशासनात कन्नड भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर सुरु झाला. तसेच निपाणी, नरगुंद, नवलगुंद येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला. त्यात अनेक शेतकरी ठार झाले.

आर. गुंडूराव यांच्या काळात प्रशासनात कन्नड भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर सुरु झाला. तसेच निपाणी, नरगुंद, नवलगुंद येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला. त्यात अनेक शेतकरी ठार झाले. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांचे ते खलनायक ठरले. त्यांच्या कारकिर्दीत लागलेला सर्वात मोठा डाग ठरला. त्यामुळे ते आजपर्यंतचे सर्वात वादग्रस्त मुख्यमंत्री म्हणून ओळखले गेले.

आर. गुंडू राव यांचा जन्म २७ सप्टेंबर १९३७ ला कोडगू जिल्ह्यातील कुशालनगर येथे झाला. के. रामा राव आणि चिन्नम्मा हे त्यांचे आई-वडील होत. त्यांचे वडिल स्थानिक शाळे मुख्याध्यापक होते. ते बॅडमिंटनचे कुशल खेळाडू होते आणि अनेक स्पर्धा त्यांनी जिंकल्या होत्या. त्यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री म्हणून १९८० ते १९८३ पर्यंत काम पाहिले.

गुंडू राव कुशालनगर नगर पंचायतीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी नगर पंचायतीत दहा वर्षे विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. त्यांनी १९७२ ला त्यांचे भाग्य उजळले. कोडगू जिल्ह्यातील सोमवारपेठ विधानसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे आमदार म्हणून पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. १९७८ ला पुन्हा त्यांनी सोमवारपेठेतून संधी मिळाली. त्यानंतर त्यांचा आलेख चढताच राहिला. देवराज अर्स यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यानंतर थोड्या काळासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले.

देवराज अर्स यांचे सरकार कोसळल्यानंतर त्यांना थेट मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर त्यांनी बंगळुरातील सुप्रसिद्ध मॅजेस्टीक बसस्टेशन निर्मितीकडे लक्ष दिले. आशिया खंडातील सर्वात मोठे बसस्टँड म्हणून त्यावेळी त्याची ओळख बनली होती. नंतर या बसस्टँडचे नामांतर केंपेगौडा बसस्टेशन असे करण्यात आले. राज्यात अनेक ठिकाणी त्यांनी मेडिकल आणि इंजिनियरिंग महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांच्याच कार्यकाळात कावेरी प्रकल्पाचा दुसरा टप्पा केवळ दीड वर्षात पूर्ण करण्यात आला. तसेच म्हैसुरातील सुप्रसिद्ध कालामंदिरांची निर्मितीही त्यांच्याच काळात झाली.

आर. गुंडूराव यांच्या काळात प्रशासनात कन्नड भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर सुरु झाला. तसेच निपाणी, नरगुंद, नवलगुंद येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला. त्यात अनेक शेतकरी ठार झाले. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांचे ते खलनायक ठरले. त्यांच्या कारकिर्दीत लागलेला सर्वात मोठा डाग ठरला. त्यामुळे ते आजपर्यंतचे सर्वात वादग्रस्त मुख्यमंत्री म्हणून ओळखले गेले. १९८९ ते १९९१ अशा काळात बंगळूर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडूण गेले होते. २२ आॅगस्ट १९९३ ला त्यांचे केवळ ५६ व्या वर्षी लंडनमध्य कर्करोगाने निधन झाले.

दिनेश गुंडूराव सलग पाचवेळा आमदार

पुत्र दिनेश गुंडू राव हे बंगळुरातील गांधीनंगर या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांचा जन्म ९ आॅक्टोबर १९६९ ला कुशालनगर येथे झाला. सध्या त्यांच्याकडे अखिल भारतीय काँग्रेसचे गोवा, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीचे प्रभारी आहेत. कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे ते अध्यक्षही होते. त्यांचे शिक्षण बंगळुरातील बिशप कॉटन बाईस स्कूलमध्ये झाले. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये बी. ई. पदवी घेतली आहे. त्यांचा विवाह तबस्सुम यांच्याशी झाला असून त्यांना दोन मुली आहेत. १९९९ च्या निवडणुकीत बंगळुरातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधानसभेसाठी पहिल्यांदा रिंगणात उतरले. त्यावेळी ६१ हजार २१२ मतदान झाले होते. त्यापैकी दिनेश गुंडूराव यांना ४० हजारपेक्षा जास्त मते घेऊन ते विजयी झाले. ते कर्नाटक युवा काँग्रेसचे अध्यक्षही होते. त्यांनी सलग पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()