भरतपूर (राजस्थान) : ‘‘काही जण स्वत:ला जादूगार समजतात. परंतु आता राजस्थानची जनता हेच म्हणेल, की ३ डिसेंबर.. काँग्रेस छू मंतर. राजस्थानमध्ये सर्वत्र एकच नारा ऐकू येत आहे. भाजप सरकार येत आहे,’’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अशी घोषणा केली.
राजस्थानच्या भरतपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय संकल्प सभेला मार्गदर्शन केले. येत्या २५ नोव्हेंबरला मतदान होत असून प्रचाराला काही दिवस राहिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलेात यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. राजस्थानातील मुली, भगिनींवर आणि दलितांवर अत्याचार झाले आणि सरकार मात्र मूग गिळून गप्प आहे. होळी, रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सवासह कोणताही उत्सव शांततेने साजरा करता आले नाहीत. काही ठिकाणी हिंसाचार, दगडफेक झाली तर काही भागात संचारबंदी होती.
ज्या ठिकाणी कॉंग्रेसचे सरकार आहे तेथे दहशतवादी, गुन्हेगार आणि समाजकंटक मोकाट सुटलेले असतात. कॉंग्रेससाठी लांगूलचालनच धोरण आहे. यासाठी ते कोणाचाही जीव धोक्यात घालतात, असा आरोप पंतप्रधानांनी केला. जनतेने मोठ्या विश्वासाने कॉंग्रेसच्या हाती सत्ता सोपविली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर कॉंग्रेसने राजस्थानची वाट लावली. विकासाच्या ऐवजी राजस्थानला मागे ढकलले, असं मोदी म्हणाले.
राजस्थानात भाजपने अलीकडेच संकल्पपत्र जारी केले. त्यावर मोदी यांनी संकल्पपत्र तयार करणाऱ्या टीमचे कौतुक केले आणि संकल्पपत्रात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचीही हमी आपण देत आहोत, असे मोदी म्हणाले. भ्रष्टाचारावर प्रहार करण्याचा भाजपचा संकल्प आहे. माता भगिनींना सुरक्षित वातावरण देण्याचे काम भाजप करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. मुख्यमंत्री गेहलोत यांना दिल्लीत बसलेले कॉंग्रेसचे नेतेही घाबरत आहेत, असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.